मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांना पत्र लिहीले आहे. करोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकार व मुंबईतील सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनशून्य कारभार व अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचेही लसीकरण हे सरकार पूर्ण करु शकले नाही. अशा शब्दात नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.
नितेश राणे पत्रात म्हणतात, आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्यासाठी सगळं खापरं करोनावर फोडायचं आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी सेना राबवत आहे, हे अत्यंत निंदनिय आहे.
. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/LovI6USL4H
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 30, 2021
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलनं करावी लागली. सरकार साधं विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकलं नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या. ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पुर्ण करता आलेला नाही.
२६ जानेवारीपासून मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही. करोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे दोन डोस झालेले नाहीत! ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे.
आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम महापालिकेने हाती घेतल्यानंतर ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण झाले. यातील फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जणांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे. मुंबई महानगर पालिका आपल्याचं कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोंधळच दर्शवतो.
कालच आपण महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळात करोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली. पण मला खात्री आहे की ही वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असेल. म्हणूनच मी हे वास्तव आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छितो. जेणेकरून महानगर पालिकेचे फ्रंटलाईन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना संशय निर्माण ना होवो की ठाकरे सरकार हे त्यांच्यासोबत संधीसाधूपणाचं राजकारण तर करत नाही ना?, असा सवाल नितेश राणेंनी पत्रात उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘खोटं बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण!’
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- IPL मधील टीम कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज करणार फैसला
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

