Share

‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत(Ajit Pawar) शपथ घेण्याच्या निर्णयावरुन पश्चात्ताप व्यक्त केला आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला.

यावेळी बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,’शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आले होते. पण आता आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असंही सारखं वाटतं. मला माहिती आहे त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केले होते,’ असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पुढे राज्य सरकारवर टीका करत ते म्हणाले की,’राज्य सरकारने १० हजार मृत्यू लपवले. सरकारने कोरोना स्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचे सांगत आपली पाठ थोटपली, मात्र देशातील एकूण मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाल्याचं सत्य ते स्वीकार का करत नाहीत?.’

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!