Share

…या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा

Published On: 

नवी-दिल्ली : जगातील सर्वाधिक चर्चेमधील मायक्रोब्लॉगींग वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटर कंपनीमध्ये सोमवारी(२९ नोव्हें.)मोठी उलथापालथ झाली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल(Parag Agrawal) यांना नियुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा कंपनीने केल्यानंतर भारतीयांनी अजून एका मोठ्या कंपनीच्या प्रमुखपदावर भारतीय व्यक्ती विराजमान होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

पॅट्रीक कोलीसन यांनी ‘गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडॉब, आयबीएम, पालो अॅल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे सीईओ सुद्धा भारतीय आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे हे यश कमालीचं आहे. यामधून अमेरिका विस्थापितांना किती संधी देते हे दिसून येतं’, असे एक ट्विट केले होते. हे ट्विट रिट्विट करत यासंदर्भात ट्विट करत महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा(Anand Mahindra) म्हणाले की,’ही एक अशी जगभरामध्ये पसरलेली साथ आहे ज्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा इंडियन सिईओ व्हायरस आहे. यावर कोणतीही लस नाही.’

दरम्यान, जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ आता अग्रवाल यांचे नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!