नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार शशी थरुर (MP Shashi Tharoor)यांनी केलेल्या एका ट्वीटवरून ते सध्या जाम चर्चेत आहेत. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु झाल्याच्या निमित्ताने शशी थरुर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला महिला खासदारांसोबतचा एक फोटो ट्विट केला होता. मात्र यावेळी त्यांनी दिलेली कॅप्शन अनेकांना आक्षेपार्ह वाटल्याने त्यांच्यावर आता टीका आणि ट्रोल होण्यास सुरुवात झाली. आता याप्रकरणावरच तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty)यांनी प्रतिक्रिया देत शशी थरुर यांचा बचाव केला आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पटियालाच्या खासदार प्रनीत कौर, दक्षिण चेन्नईच्या खासदार थमिझाची थंगापांडियन, जादवपूरच्या खासदार मिमी चक्रवर्ती, बशीरहाटच्या खासदार नुसरत जहाँ आणि करूरच्या खासदार एस जोथिमनी यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला होता.आणि “कोण म्हणतं लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही? सकाळी माझ्या सहकारी खासदारांसोबत,” असं कॅप्शन यावेळी त्यांनी दिलं होतं. यावरूनच खासदार राजेश नागर यांनी ट्विट करत म्हटलं की, “मिस्टर थरुर…लोकसभा ही महिलांसोबत सेल्फी घेण्याची आणि त्यांना आकर्षक म्हणण्याची जागा नाही. तुम्ही भविष्यातील खासदारांसाठी चुकीचं उदाहरण ठेवत आहात”. आता यालाच मिमी चक्रवर्ती यांनी राजेश नागर यांच्या ट्विटला उत्तर देताना सेल्फी शशी थरुर यांनी नाही तर मी घेतला असं सांगत त्यांचा बचाव केला आहे.
Mr. Tharoor, Loksabha is for Legislation not for taking selfies with women and calling them "Attractive". You are settling a wrong precedent for future MPs.
….@mlkhattar— Minister Rajesh Nagar (@rajeshnagarfbd) November 29, 2021
He didn’t take the selfie sir i did. https://t.co/xelIrFyNWJ
— Mimi chakraborty (@mimichakraborty) November 29, 2021
दरम्यान या वादानंतर शशी थरूर यांनी माफी मागितली आहे.तसेच महिला खासदारांच्या पुढाकाराने हा फोटो विनोदी पद्धतीने काढण्यात आल्याचे सांगितले आणि त्यांनीच मला त्याच भावनेने ट्विट करण्यास सांगितले, अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- महापौर किशोरी पेडणेकरांनी मध्यरात्री अचानक मुंबई विमानतळाला भेट देत केली पाहणी
- १५ दिवसांमध्ये आफ्रिकेतून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल; १०० प्रवाशांच्या होणार पुन्हा चाचण्या
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- पालकमंत्री सुभाष देसाईंचा निधी वाटपात अन्याय; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बाळासाहेब थोरातांकडे तक्रार!

