Share

IPL मधील टीम कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज करणार फैसला

Published On: 

मुंबई: ‘IPL’च्या नव्या हंगामात लखनऊ(Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad)या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. १५व्या हंगामासाठी संघात कायम राखण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची मुदत मंगळवारी म्हणजेच आज संपणार आहे. त्यामुळे आठही संघ नेमके कुणाला संघात ठेवणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक संघाला जास्तीत जास्त चार खेळाडू संघात कायम राखण्याची परवानगी आहे. त्यामध्ये तीन भारतीय आणि एक विदेशी अथवा दोन भारतीय आणि दोन विदेशी अशा खेळाडूंना कायम राखू शकतात. चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड या तीन खेळाडूंना आधीच कायम राखल्याची माहिती मिळते आहे. आता अन्य संघांतील खेळाडू यांच्याबाबत आज स्पष्टता मिळेल.

‘आयपीएल’च्या नव्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य संघांना तीन खेळाडूंची निवड करण्याची १ ते २५ डिसेंबरदरम्यान संधी आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये खेळाडूंची लिलावप्रक्रिया होईल. दरम्यान आज सायंकाळी ५ वाजता खेळाडूंचा फैसला होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!