Share

‘खोटं बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण!’

Published On: 

मुंबई : कोरोना काळात राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच महाराष्ट्रात ३५ टक्के मृत्यू झाले आहेत. खोट बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण राहीले आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. यावर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीसांची ही क्लिप शेअर करत टीका केली आहे.

प्रसाद लाड ट्विट करत म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण! सरकार कोरोना काळातील परिस्थिती हाताळू शकले नाही, राज्यसरकारचे सपशेल अपयश आहे!, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपली पाठ थोपटून घेणं, हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे. आपलं प्रगतीशील राज्य आहे ना, मग देशातील ३५ टक्के मृत्यू महाराष्ट्रात का? सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची का? सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात का? याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. मोदींजीचं एक अतिशय स्पष्ट धोरण आहे. एखादी गोष्ट जर चांगली झाली तर ते चांगल म्हणतात.

एखादं चांगल काम यांनी केलं आणि मोदींजींनी चांगल म्हणलं की लगेच सर्टिफिकेट देत फिरतात. खांट बोल पण रेटून बोल या एकाच गोष्टीत एक वाक्यता या सरकारमध्ये आहे. एक जण खोटं बोलतो आणि मग सर्वच जण त्याची बाजू घेतात. महाराष्ट्र सरकार कोरोनामध्ये फेलियर आहे, हे आकडे सांगतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!