मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांचा जामीन अर्ज आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे जामीन मिळवण्यासाठी नितेश राणे यांना सत्र न्यायालयाविरोधात जिल्हा न्यायालयात जावे लागणार आहे.
संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचा जामीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, “नितेश राणे यांनी कोर्टात शरणागतीचा कोणताही अर्ज केलेला नाही. जोपर्यंत शरण येत नाहीत तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होता येत नाही. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जामीन मिळत नाही. त्यामुळे कोर्टाने अर्ज फेटाळला असून ते आता हायकोर्टात जातील. पण त्यांना आधी शरण जावं लागेल मगच त्यांना जामिनासाठी अर्ज करता येईल”.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यासंबंधी जामीन अर्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत येथे हल्ला झाला होता. याप्रकरणी आमदार नितेश राणे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आपल्याला अटक होऊ नये म्हणून त्यांनी अनुक्रमे सत्र, जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता .
दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन अर्ज करण्यासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला त्यावर अनिल परब यांनी ”नितेश राणे यांना जामीन मिळवण्यासाठी आधी शरण जावं लागेल” अशी प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या बातम्या :
- यंदाचाही ‘अर्थहीन’ अर्थसंकल्प; अजित पवारांची प्रतिक्रिया
- Budget 2022: क्रीडा क्षेत्रातही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आजपर्यंतचे सर्वात छोटे अर्थसंकल्पीय भाषण!
- अर्थसंकल्पावर कॉँग्रेसची नाराजी; अर्थमंत्री आणि पंतप्रधानांवर केली टीका
- विलासराव देशमुख म्हणायचे, विरोधकांना चांगले काम दिसेल असा चष्मा तयार करा-अमित देशमुख


