Share

अर्थसंकल्पावर कॉँग्रेसची नाराजी; अर्थमंत्री आणि पंतप्रधानांवर केली टीका

Published On: 

नवी दिल्ली: संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पावर (Finance Budget 2022) कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शाब्दिक टीका केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, पगारी नोकरवर्ग, मध्यमवर्गीय आणि तरुणांसाठी कोणतेही प्रयोजन केले नसल्याचे म्हंटले आहे. तसेच आयकर स्लॅब (Income Tax) मध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे नमूद केले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी ट्विट करत हा अर्थसंकल्प, अर्थसंकल्पच नाही असे म्हंटले आहे. आपल्या संदेशात त्यांनी, गरिबांचे खिसे रिकामे आहेत, नोकरदार वर्गाचे खिसे रिकामे आहेत, मध्यम वर्गाचे खिसे रिकामे आहेत, शेतकरी कंगाल आहे, तुरूणांचा अपेक्षाभंग झाला आहे तसेच केंद्र सरकारने छोट्या उद्योगांना चालना देण्याचे काहीच प्रयोजन या संकल्पात केले नाही असे म्हंटले आहे.

अर्थमंत्री निर्मला सितरामन (Nirmala Sitaraman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प  – २०२२ सादर केला. यात, नोकऱ्या, घरे, शिक्षण, शेतकरी, संरक्षण, व्यवसाय, आणि क्रिप्टो चलन यांसह बऱ्याच क्षेत्रात मोठ्या घोषणा केल्या आहेत.  अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाचे पुढील २५ वर्षांसाठी ‘ब्लू प्रिंट’ असे वर्णन केले. तसेच २०१९ पासून केंद्रीय अर्थमंत्री पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर सीतारामन यांनी चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!