सिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे भाष्य करत टीकास्त्र सोडलं आहे. ‘या महाविकास आघाडी सरकारची दूरदृष्टीला सलाम! यांना माहीत होते.. पर्यावरणमंत्र्या ची “दिशा” चुकली.. मग आता वनमंत्री “पूजा” घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत.. बाकी मंत्र्यांचे पण “कहानी घर घर की” चालू आहे.. म्हणूनच “जेल पर्यटन” चालू केले असावे! जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?,’ अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
या महाविकास आघाडी सरकारची दूरदृष्टीला सलाम!
यांना माहीत होते..
पर्यावरणमंत्र्या ची "दिशा"चुकली..
मग आता वनमंत्री "पूजा ”घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत..
बाकी मंत्र्यांचे पण "कहानी घर घर की" चालू आहे..
म्हणूनच “जेल पर्यटन"चालू केले असावे!
जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?— Nitesh Rane (@NiteshNRane) February 14, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- भारताची कसोटीवर पकड ! दुसऱ्या दिवसाखेर एक बळी गमावून देखील भक्कम स्थिती कायम
- पूजा चव्हाण प्रकरणात सत्य बाहेर आलेच पाहिजे-रावसाहेब दानवे
- ‘कोरोनामुळे अनेकांनी जवळची लोकं गमावली, त्यामुळे शिवजयंती…’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणालाही पाठीशी घालणार नाहीत; संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’


