चेन्नई : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात कालपासून दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या. या धावसंख्येपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आहे. परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी तळातील भारतीय फलंदाजांच्या पटापट विकेट काढल्या. त्यामुळे ९५.५ षटकात ३२९ धावांवर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला.
यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र, दुसरा दिवस हा भारतीय संघाच्या पारड्यात पडला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३४ धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाची स्थिती भक्कम झाली आहे. फिरकीपटू आर. अश्विनने चार विकेट्स मिळवल्या. तर, अक्सर पटेलने ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पहिला बळी घेतला. यासोबतच इशांत शर्माने देखील २ बळी मिळवत महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं.
विकेटकिपर बेन फॉक्स (१०७ चेंडूत ४२ धावा)वगळता इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान, भारतीय संघाकडे २४९ धावांची आघाडी आहे. तर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ५४ धावांवर एक बळी गमवावा लागला आहे. शुभमन गिल २८ चेंडूत १४ धावा काढत पायचित(lbw) झाला. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा ही जोडी उद्या मैदानात पुन्हा उतरेल. शर्मा ६२ चेंडूत २५ धावा तर चेतेश्वर पुजारा १८ चेंडूत ७ धांवांवर बिनबाद राहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी फकीर आहे, धनंजय मुंडेचं नाव आत्ता घेतोय,आधी घेतलं व पुढे देखील घेणार’
- पूजा चव्हाण प्रकरणात सत्य बाहेर आलेच पाहिजे-रावसाहेब दानवे
- ‘कोरोनामुळे अनेकांनी जवळची लोकं गमावली, त्यामुळे शिवजयंती…’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणालाही पाठीशी घालणार नाहीत; संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

