🕒 1 min read
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल नेस्ले सभागृहात शिवसेना गटप्रमुखांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून आता भाजप आणि शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरेंवर पलटवार करत आहेत. उद्धव ठाकरेंनी सभेत शिवजयंती वरुन एक वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यावेळी ठाकरे कदाचित शिवजयंतीची तारीख विसरल्याने भाजप नेते नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांना कानशिलात लगावण्याची भाषाः
उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते नितेश राणे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओवर कॅप्शन देत नितेश राणेंनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? असा सवाल त्यांनी केला आहे.
नालायक म्हणून केला उद्गारः
यादरम्यान, उद्धव ठाकरेंसाठी नालायक हा उल्लेख देखील नितेश राणेंनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट संतापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक कालच्या सभेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत, आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच… तुम्हाला आसमान दाखविल्या शिवाय राहणार नाही, असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे. मात्र, महाराजांचा इतिहास शिकत मोठे झालेल्या ठाकरेंना शिव जयंतीची तारीख लक्षात नसल्याने अनेक जण टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- OnePlus New Launch | OnePlus 10R 5G चे प्राइम ब्लू एडिशन होणार आहे लॉन्च, जाणून घ्या फोनचे फीचर्स..
- Maharashtra Rain Update | राज्यात पुढील काही दिवस ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
- Eknath Shinde | “…आता बोलणारे तेव्हा काय करत होते?” शिंदेंचा विरोधकांना सवाल
- Saamana | “महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे, बाकी..” सामना आग्रलेखातून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
- Uddhav Thackeray | “महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके’ कंपनीत झाली आहे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
