Share

Maharashtra Rain Update | राज्यात पुढील काही दिवस ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Published On: 

🕒 1 min read

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागत आणि फवारणीची कामं सुरू केली आहे. दरम्यान मंगळवार २७ सप्टेंबरपर्यंत राज्यात कमी अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार वायव्य भारतात प्रतीचक्राकार वारे निर्माण झाल्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड व दिल्लीमधून लवकरच मान्सुन निरोप घेण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. बंगालचा उपसागरात बंगाल-ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

या हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात २२ सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ आणि २२ सप्टेंबरपर्यंत विदर्भात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पूर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

२३ तारखेलाही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारे २७ सप्टेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे काटेपुर्णा, वान, दगडपारवा, पोपटखेड, मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा जमला आहे. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!