Share

Eknath Shinde | “…आता बोलणारे तेव्हा काय करत होते?” शिंदेंचा विरोधकांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून, शिवसेना पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करत असतात. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल दिल्लीमध्ये बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला तेव्हा आता बोलणारे काय करत होते?,असा खोचक सवाल एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना केला आहे. मराठी टक्का कुणामुळे कमी झाला. मराठी माणसाला बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, वसई विरारला जायला भाग पाडलं त्याला जबाबदार कोण? फक्त मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं. त्यामुळे मुंबईकर जनता आगामी निवडणुकीत यांना धडा शिकवेल.

गेल्या 2 वर्षापासून वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात करण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु तत्कालीन सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आमचं सरकार येऊन केवळ दोन महिनेच झाले आहेत. तरी आमच्या सरकारनं प्रयत्न केल्यामुळे सलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचं वेदांताने जाहीर केलं. त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे सूड भावनेने, आकसापोटी टीका करत आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादाचे खरे वारसदार आहोत. त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर तेही उत्तर देऊ. पुढे बोलताना शिंदे असंही म्हणाले, 50 आमदार, 12 खासदार एवढा मोठा निर्णय होत नाही. बोलायला ठीक आहे. त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय काहीच शिल्लक नाहीय.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!