Share

Uddhav Thackeray | “महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके’ कंपनीत झाली आहे”

Published On: 

मुंबई : वेदांता-फॉकस्कोन प्रकल्प गुजरातला गेल्याचं कळल्यापासून महाराष्ट्रीतील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा प्रकल्प राज्यातून जाण्यामागे सत्ताधाऱ्यांची चूक आहे असं विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. तर सत्ताधारी या सगळ्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्यचं म्हणत आहेत. अशातच पुन्हा एकदा शिवसेना पक्षाने आपलं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेख मधून सत्ताधाऱ्यांवर निधाणा साधला आहे.

काय म्हटलंय सामना अग्रलेखात ?

महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके’ कंपनीत झाली आहे. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणुकदारांची पळापळ सुरू आहे, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजप-शिंदे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

नाहीतर महाराष्ट्राला वाघाचा पंजा मारावा लागेल-

काही लोक असे असतात की, ते ज्याची सत्ता तिकडे आपली टोळी जोडतात व पेंढाऱ्यांप्रमाणे लूट करतात.उद्योग, व्यापार वगैरेंसाठी असे वातावरण निर्माण होणे बरे नाही. त्यात महाराष्ट्राचे हित आहे काय? याचा विचार फडणवीस यांनी करायचा आहे. मुंबई-महाराष्ट्राचे वैशिष्टय. मुंबई सगळ्या देशाचे पोट भरते, पण मुंबई-महाराष्ट्राच्या पोटावर लाथ मारून कोणी वेगळे काही करत असेल तर मात्र महाराष्ट्राला वाघाचा पंजा मारावा लागेल.

फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातून हिसकावून नेल्यापासून फडणवीस सरकार हे सगळय़ांच्याच टीकेचे लक्ष्य बनले आहे. शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे फडणवीसांवर राजशकट हाकण्याची जबाबदारी आहे. म्हणूनच ‘फॉक्सकॉन’ प्रकरणात फडणवीस काय म्हणतात याकडेच गांभीर्याने पाहिले जाते. तसेच, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंवर शिवसेना फोडण्याची, गणपती दर्शन, उत्सव मंडळे, पूजा, लग्न समारंभांना भेटी देण्याची जबाबदारी आहे, असं म्हणत शिवसेनेने शिंदेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!