सिंधुदुर्ग: संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंचा अटक पूर्व जमीन सिंधुदुर्ग कोर्टाने फेटाळला. त्यानंतर ते उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेणार की, शरण जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याच पार्श्वभूमीवर राणेंनी मात्र कोणत्याही वरच्या कोर्टात पुन्हा जामीन अर्ज करण्यापेक्षा न्यायालयाला शरण जाण्याची तयारी दाखवत ते पोलिसांना स्वाधीन झाले.
अटकेनंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन एक फोटो शेयर करत ‘समय बडा बलवान है | इंसान खामोखा गुरूर करता है|’ह्या ओळी लिहिल्या. आता अटकेनंतर अचानक हा फोटो त्यांना का शेअर कारावास वाटला? हे जाणून घेऊया.
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना पी. चिदंबरम गृहमंत्री होते त्यावेळी, शोरबुद्दीन शेख यांच्या फेक एनकाऊंटर प्रकरणी २०१० साली अमित शहा यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती तर २०१९ साली भाजपची सत्ता असताना गृहमंत्री अमित शहा होते. दरम्यान आयएनएक्स मीडिया आणि एअरसेल प्रकरणी पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कारती याला अटक केली गेली होती. वेळ फार मोठी असते आणि ती कधी कोणावर उलटेल हेच या राजकारणातून सूचित होते.
महत्वाच्या बातम्या:
- चक्क रस्त्यावर फ्रेंच फ्राईज खाताना दिसली उर्फी जावेद, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
- “मी सचिनला बॉलिंग करायला घाबरायचो”; ब्रेटलीने केला मोठा खुलासा
- “दागिने उत्पादक कारखान्याद्वारे होईल १ लाख रोजगार निर्मिती”, सुभाष देसाईंची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
