Share

‘आपल्याच देशात भगवद् गीतेच्या पठणाला विरोध…’; आमदार नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणाच्या ठरावाची सुचना महापौरांना भारतीय जनता पक्षाच्या योगिता कोळी यांनी केली. पण त्यावर लगेचच समाजवादी पक्षाकडून विरोध केला जातोय. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीतेचं पठण करण्यास मान्यता देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नितेश राणे म्हणाले, भगवद् गीतेच महत्व जगाने ओळखलं आहे. त्यास विरोध करण्यासारखं काहीच कारण नाही. आपल्या शाळेत भगवद्गीतेचं नाही, तर मग फतवा-ए-आलमगिरीचं पठण झालं पाहिजे का?, असा सवाल केला आहे. या मुद्द्यावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून पालिकेला आदेश देण्याची मागणी केली आहे.

तसेच पुढे बोलताना राणे म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून आम्ही आपल्याकडून अपेक्षा ठेवतो की भगवद्गीतेचं पठण महापालिका शाळांमध्ये होण्यासाठी योगिता कोळी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!