मुंबई : राज्यातील सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर तालिका अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांनी सभागृगात गैरसंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना एक वर्षासाठी निलंबित केलं आहे.
शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम भाजपा आमदारांनी केलं आहे. जी घटना घडली ती मी सभागृहात सांगितली, फडणवीस यांना खोटं बोलण्याची सवय आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘आम्ही कोकणातले आहोत तसे जाधवही कोकणातले आहेत. कोकणात दशावतार असतात आणि त्यात नरकासूर असतो. तो वेगवेगळे सोंगे बदलतो. त्यात सोंगाड्याही असतो . भास्कर जाधवांना ओळखणाऱ्यांना ते कसे सोंगाड्या आहेत, हे माहिती आहे. ते नरकासुरासारखे असून, ते एकच सोंग कायम ठेवत नाहीत. जाधवांना कोणीही शिवी दिली नव्हती. कोणीही काहीही केलं नाही. तमाशातील सोंगड्या कसा असतो, नरकासूर कसा असतो तसे भास्कर जाधव आहेत.’
आ.भास्कर जाधव हा *संकासुर* आहे !!!
कोकणच्या दशावतारात संकासुराणे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे चोरून समुद्राच्या तळाशी शंकात जाऊन लपला.त्याच प्रमाणे भास्कर जाधव यांनी, संविधानाने आमदारांना
दिलेले अधिकार चोरून नेले आणि निलंबनाची कारवाई केली आहे!!!— Nitesh Rane (@NiteshNRane) July 6, 2021
कोकणच्या दशावतारात संकासुराणे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे चोरून समुद्राच्या तळाशी शंकात जाऊन लपला. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांनी, संविधानाने आमदारांना दिलेले अधिकार चोरून नेले आणि निलंबनाची कारवाई केली आहे अशी जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत असताना मुंडे भगिनी कोठे आहेत? विविध चर्चांना आले उधाण
- ‘१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात हायकोर्टात जाणार’, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची माहिती
- अजित पवारांची मोठी घोषणा! राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्त पदे भरणार
- ‘चिंधीचोर भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो, त्याला मुंगीही मारणार नाही’
- ‘सर्व केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?’, फडणवीसांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

