Share

अजित पवारांची मोठी घोषणा! राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्त पदे भरणार

Published On: 

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्त पदे भरण्यास अर्थविभागाने मंजूरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात २०१८ पासून विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदभरतीसाठी मान्यता देण्यात आली असून यात गट अ, ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सरकारच्या सर्वच विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय कामांत अडथळे येत आहेत. तसेच बरोजगारी वाढली आहे. याबाबत एका विद्यार्थ्याने काल आत्महत्या केल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चिला गेला. स्पर्धा परीक्षा देण्यारे विद्यार्थी आत्महत्या करू लागले, याबाबत विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळे स्वप्निल लोणकर या आत्महत्या केली. यामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या मुद्द्यावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केली.

त्यानंतर आज राज्य लोकसेवा आयोगाकडून सुमारे १५ हजार ५१५ रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आरक्षणानुसार ही पदे भरली जातील. या निर्णयांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत, असं पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या घोषणेमुळे एमपीएससी विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!