Share

भाजप अडचणीत असताना मुंडे भगिनी कोठे आहेत? विविध चर्चांना आले उधाण

Published On: 

औरंगाबाद : पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मोठा गदारोळ सुरू आहे. अधिवेशनाची सुरुवातच वादळी होत १२ भाजप आमदारांचे निलंबन झाले आहे. विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्यामुळे आणि सभागृहात बेशिस्त वर्तन केल्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहेत.

त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भाजपने विधानभवन परिसरात चांगलाच गोंधळ घातला. अभिरूप विधानसभा भरवत महाविकास आघाडीला दणका देण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रतिअधिवेशनावर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपाने माध्यमांच्या कक्षात जाऊन प्रतिविधानसभा आयोजित केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टीका केली.

दरम्यान, राज्यातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात रान पेटवले आहे. सोशल मीडिया, माध्यमांना मुलाखतीद्वारे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून १२ आमदारांना निलबिंत केल्याबद्दल ठाकरे सरकारचा विरोध करत आहेत.

पण भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या कारवाईबद्दल शब्दही उच्चारला नाही. शिवाय त्यांच्या भगिनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनीही यावर काहीही भाष्य केलेले नाहीये. २६ जून रोजी ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली चक्का जाम करण्यात आला होता. याच ओबीसी आरक्षणाच्या ठराव मुद्द्यावरून भाजपचे १२ आमदार निलंबित झालेत. पण पंकजा यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पंकजा मुंडे यांच्या ट्विटर अकाउंटवर शेवटची पोस्ट दि.२ जुलै रोजीची आहे. एका कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. तर प्रीतम मुंडे यांनी आज सकाळीच ट्विटरवरून भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. पंरतू, राज्यातील राजकीय घडामोडींवर चकार शब्दही काढला नाही. एरवी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मुद्द्यांवर मत व्यक्त करणाऱ्या, राज्य सरकावर टीका करणाऱ्या मुंडे भगिनींनी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर प्रतिक्रिया न दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रमुख नेत्या शांत का?
भाजपला सध्या आक्रमक नेत्यांची गरज आहे. पंकजा मुंडे यांना भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून पाहिले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे राजकारणाच्या पलीकडेही स्नेहाचे नाते आहे. सत्तेत नसतानाही मुख्यमंत्री ठाकरेंच्या माध्यमातून पंकजा यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे आमदारांच्या निलंबनावर पंकजा यांनी काही भाष्य केले तर मुख्यमंत्री त्याची दखल घेतील यात शंका नाही. परंतू, राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्या जर काही आमदार निलंबन प्रकरणावर काहीही बोलत नसतील तर यावरून काय संदेश घ्यायचा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!