Share

‘सर्व केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?’, फडणवीसांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य सरकारने १२ आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. प्रतिअधिवेशनावर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपाने माध्यमांच्या कक्षात जाऊन प्रतिविधानसभा आयोजित केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यावरूनही फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकार करणार, कर्जमाफी केंद्र सरकार देणार, चक्रीवादळग्रस्तांना मदत, पीक विमा केंद्र, राज्याचं अर्थकारण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण, मेट्रोचं काम, रेमडेसिवीर, पीपीई किट, ऑक्सिजनचा पुरवठा, लसीकरण असे सगळे कामे जर केंद्र सरकारने करायचे आणि यांनी इथे केवळ वसुल्या करायच्या का?

सर्व केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय? असा सवाल त्यांनी केला. या सरकारच्या प्रत्येक विभागातला वाझे जर समोर आणला तर या सरकारमध्ये काय चाललंय ते समजेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला सत्तेवर काय भजी-वडे तळायला बसवलंय का? अशा प्रकारचे राज्यकर्तेच पाहिले नाहीत, ज्यांना आत्मविश्वास नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!