Share

‘चिंधीचोर भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो, त्याला मुंगीही मारणार नाही’

Published On: 

मुंबई : विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजप आमदारांनी शिविगाळ, धक्काबुक्की केल्याची तक्रार केली आहे. त्यावरून १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. या घडामोडींचे पडसाद उमटलेत. त्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भास्कर जाधव यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

त्या अनुषंगाने जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही सदस्यांनी केली. यावर ते म्हणाले की, कालची घडलेली घटना, सोशल मीडियावर सुरू असलेला प्रकार आणि विरोधक देत असलेलं आव्हान आणि आंदोलनाच्या इशाऱ्यांमुळे माझ्या कुटुंबियांना चिंता आहे. त्यामुळं सरकारला वाटलं तर मला सरकारनं संरक्षण द्यावं असं जाधव म्हणाले. त्यावर ‘तालिका अध्यक्षांना त्यांची इच्छा असो किंवा नसो, त्यांना संरक्षण देण्यात येईल’, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधव आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘अशा चिंधीचोरांना संरक्षण देण म्हणजे पोलिस दलाचा अपमान आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य राणेंनी केलेय.

ते म्हणाले, ‘आणि हे वाघ म्हणे. अशा चिंधीचोरांना संरक्षण देण म्हणजे पोलिस दलाचा अपमान आहे. ज्याला मुंगी मारणार नाही त्याला पोलीस संरक्षण देऊन जनतेच्या पैशाचा चुराडा का करत आहात?? भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो त्याला कोणीही मारणार नाही. आम्ही स्टँडर्ड बघून मारतो.’ असे म्हणत निलेश राणेंनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!