Share

Ajit Pawar | शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली, अजित पवारांनी दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. सिल्व्हर ओक येथील शरद पवार यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलाने पवार यांची हत्या करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.

सिल्वर ओकवरील पोलीस ऑपरेटरने या धमकी संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. आरोपींनी हिंदीत धमकी दिली. या घटनेनंतर जवळच्या गमदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ डिसेंबरला ही धमकी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितलं. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असं अजित पवारांनी दिली.

अजित पवार म्हणाले, “शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचं काम पोलीस करत आहेत. परंतु, त्यांचे फोन येते होते, ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. अतिशय खराब शब्द वापरत होती. दिवाळीत हे फार चालू होतं. तेव्हा तक्रार केल्यानंतर ही व्यक्ती सापडली आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या