Share

आम्हाला तुमची सगळी अंडीपिल्ली माहित आहेत, नितेश राणेंचा पुन्हा एकदा सरदेसाईंवर प्रहार

Published On: 

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.

वरून सरदेसाई यांनी राणे घराण्यावर खोचक टीका केली आहे. ‘राणेंच्या घराची पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना माहितच आहे. ते काँग्रेसमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणेंवर गंभीर आरोप केले होते. धमकावणे, मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत,’ असं टीकास्त्र सरदेसाई यांनी सोडलं आहे.

‘मला राजकीय आवड असल्याने मी या क्षेत्रात आहे. मात्र, माझी राजकीय कारकीर्द संपावी या हेतूने केवळ हे घाणेरडे आरोप नितेश राणेंनी केले आहेत. ते सगळे आरोप तथ्यहीन आहेत. त्यामुळेच मी त्यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर हे आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत. नाहीतर येत्या ७ दिवसात त्यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं,’ असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.

त्यानंतर आता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वरून सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेली खरी माहिती तपास यंत्रणेकडे पोहचवाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध नोटीस काढून तुमच्यावर कोर्टाचा दबाव टाकू असा धमकावण्याचा प्रयत्न आहे. वरूण सरदेसाई सचिन वाझेंना ओळखतात की नाही? त्यांच्यासोबत फोनवरून संभाषण झालंय की नाही? याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत काहीच सांगितलं नाही. आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीचे आरोप केले तर तुमची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू असं नितेश राणे म्हणाले आहेत.

तसेच पार्श्वभूमी कोणाला सांगताय, आम्ही ३९ वर्ष बाळासाहेब ठाकरेंची सेवा करत होतो, त्यामुळे आम्हाला सगळी अंडीपिल्ली माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावायचं असेल आणि रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल, नंदकुमार चर्तुवेदी असे अनेक विषय बाहेर काढायची तयारी असेल तर पाठवा आम्हाला कायदेशीर नोटीस, पुन्हा अशी एक पत्रकार परिषद घेत सगळं बाहेर काढेन, त्यामुळे आम्हाला धमकी देऊ नये असा इशारा आमदार नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांना दिला आहे.

नितेश राणे यांनी कोणते आरोप केले होते ?

‘देशात आयपीएलचं आयोजन देशातील नवोदित खेळाडूंना वाव मिळावं यासाठी करण्यात येतं. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजी करणाऱ्यांचं लोकेशन व इतर माहिती असल्याचं सांगत छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या,’ अशी मागणी वाझे करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.

‘वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत.’ असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.

पुढे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी,’ असं आहेत. तसेच, ‘सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!