मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला ९ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राज्यांत लॉकडाऊन आहे आणि रोज शेकडो लोक कोरोनामुळे प्राण गमवत आहेत आणि अशात कुंभमेळा व आयपीएलसारखे इव्हेंट साजरे होत आहेत. यावर राखीने आपला संताप व्यक्त केला.
https://www.instagram.com/p/CNbj0yUJecA/?utm_source=ig_web_copy_link
राखीला विचारण्यात आले तू कोणत्या आयपीएल टीमला फॉलो करते आहेस? या प्रश्नावर राखील जाम भडकली आणि म्हणाली, ‘वाह, मुंबई में लोग मर रहे हैं. हमारी जिंदगी झंड हो गई है और लोग यहां आयपीएल खेल रहे है. हम लोग छुप छुप कर गाडी चला रहे है और लोग आयपीएल खेल रहे हैं, वाह,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला आजवर देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा झाला आहे; पीयूष गोयल यांची माहिती
- महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करीत आहे : मांडवीय
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- रेल्वेमध्ये मास्क न घालणे आता पडणार महागात,‘इतक्या’ रुपयांपर्यंत केला जाणार दंड वसूल


