Share

अधिक बेड वाढविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

Published On: 

नागपूर – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूर येथे मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अन्य अधिकाऱ्यांशी एकूणच परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली.या दोन्ही रुग्णालयात दाखल होत असलेले रुग्णांचे प्रमाण, उपलब्ध सुविधा आणि इतरही एकूणच स्थितीचा आढावा घेत, प्रशासनाकडून वा सामाजिक क्षेत्रातून काय मदत लागणार यासंदर्भातील तपशीलवार माहिती त्यांनी घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी काल सकाळी नागपूर येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली आणि आणखी २०० खाटा वाढविण्यासंदर्भात नियोजन कसे करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केली. आयएमएने केवळ तज्ञ मनुष्यबळ द्यावे आणि बाकी सुविधा तसेच इतर मनुष्यबळ महापालिका देईल, असे यावेळी सांगण्यात आले. डॉक्टरांना या काळात येत असलेल्या अडचणी, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा याबाबत सुद्धा आयएमएने माहिती दिली. आमदार प्रवीण दटके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. काटे आणि डॉ. निखाडे उपस्थित होते.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गांधीनगर, नागपूर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि एकूणच व्यवस्थेची माहिती घेत आढावा घेतला. महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात 96 कोविड रुग्ण सुद्धा दाखल आहेत आणि सद्या लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. 1194 कोविड रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून सुमारे 23,000 लसीकरण झाले आहे. येणाऱ्या काळात आयसीयू सुविधा निर्माण करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष नगर लसीकरण केंद्राला भेट दिली आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!