दिल्ली : मागील वर्षी कोरोना रोगाने देशासह जगभरात थैमान घातलं होतं. सुरुवातीला या रोगावरील ठोस उपचार नसल्याने अनेक देशांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली होती. भारतात देखील काही महिन्यांसाठी टाळेबंदी करण्यात आल्यानंतर कोरोना रुग्ण आटोक्यात येताच जनजीवन सुरळीत झाले होते.
मात्र, कोरोना रोगाला रोखण्यासाठीच्या नियमांची पायमल्ली केल्यामुळे मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोना रूग्णांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत व कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र आल्याने कोरोना संसर्ग बळावण्याची शक्यता वाढल्या आहेत.
महाराष्ट्र, दिल्ली पाठोपाठ गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच संपूर्ण देशात कडक निर्बंध लागू करेल अशी शक्यता आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी बहुतांश राज्याचे आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील बैठकीला हजर होते. देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. तशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासात देशातील रुग्णसंख्येमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. रोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 नव्या कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच कोरोनामुळे 1 हजार 501 मृत्यू झाला असून 1,38,423 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते’
- स्थानिक प्रशासनानं नागरिकांबद्दल संवेदनशील राहणं आवश्यक – मोदी
- मे मध्ये देखील कडक निर्बंध लागू राहणार ? राजेश टोपेंच सूचक विधान
- एका व्यासायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव ! त्यांचा दोष काय? काँग्रेसचा फडणवीस-दरेकरांना सवाल
- ब्रुक फार्माच्या मालकाच्या चौकशीवेळी भाजप नेते वकिलीसाठी का गेले ? मलिकांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

