Share

Nitesh Rane | “सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : 23 सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. अशातच पीएफआय या संघटनेला केंद्र सरकार कडून बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असल्याचं केंद्राने सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर भाजप पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नितेश राणे ?

एकच घाव घातला पण जोरदार घाव घातला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना सलाम, असं म्हणत नितेश राणे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, पीएफआयवर बंदी घालणे ही काळाची गरज होती. आता त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही दहशतवादी संघटना बाकी आहे. सर्वांना मिटवून टाका, हा आमचा हिंदुस्तान आहे.

दरम्यान, पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सीमीचे सदस्य असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!