🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं असल्याचं दिसून येतं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोची खेळी सुरू असते. सध्या भाजप पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात टीकेबाजी सुरू झाली आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?
पंकजा मुंडे स्पष्ट आणि कार्यशील महिला आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षातली खदखद बोलून दाखवली. स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाळाला मांडीवर घेऊन खाऊ-पिउ घालून गुटगुटीत करण्याचा देशात ट्रेंड दिसतोय. त्याला पंकजा मुंडेंनी वाचा फोडली असल्याचं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे त्या असंही म्हणाल्या,मी पंकजा मुंडेंवर बोलणार नाही. कारण त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे वडील, आजोबा, काका, भाऊ असं सगळं कुटुंबच राजकारणात मुरलेलं आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंकडून राजकारणाचं बाळकडून घेतलं आहे.
पंकजा मुंडे यांचे वक्तव्य-
दरम्यान, आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची मोठी घोषणा, ‘या’ ठिकाणी घेणार दसरा मेळावा
- Nana Patole | “ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला
- “खडसे, तावडे आणि पंकजा मुंडेंनंतर फडणवीस महाजनांचा राजकीय काटा काढणार”
- Gopichand Padalkar | “जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले”
- PFI च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची सुरु होती तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
