Share

Shivsena Vs Shinde | सत्ता संघर्षाचा निकाल तब्बल एक महिना लांबला, ‘या’ तारखेला होणार निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करुन राज्यात सत्ता मिळवली. बंड करुन त्यांनी उद्धव ठाकरे यांना झटका तर दिला होताच. मात्र, एवढ्यावरच शांत न बसता त्यांनी शिवसेना पक्षावर देखील त्यांचा दावा केला. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी याचा प्रकरणाचा पुढील निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. मात्र, ही सुनावणी काही दिवसांनी नाही तर चक्क एक महिन्याने लांबवण्यात आली आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवरील सुनावणी आता दिवाळी नंतरच होणार आहे., असल्याचं समोर आलं. दिवाळी नंतर १ नोव्हेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे.

दरम्यान, धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल मागील सुनावणीत तातडीने लागण्याची शक्यता फार तुरळत असल्याची माहिती उज्जवल निकम यांनी दिली होती. निवडणूक आयोगाच्या कारवाईबाबत सुप्रीम कोर्ट स्थगिती देते की कारवाईसाठी परवानगी देतं, हे प्रामुख्यानं पाहाणं महत्वाचं असतानाच सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्याने शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाने निवडणूक आयोगाला याप्रकरणी कारवाई करण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला असून दिवाळीनंतर याचा निकाल निवडणूक आयोग लावणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!