🕒 1 min read
अमरावती : आमदार बच्चू कडू विविध कारणांनी चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र असते. यादरम्यान अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात माजी राज्यमंत्री व आमदार बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. दरम्यान रस्त्याच्या कामकाजासंदर्भात वादविवाद झाला इतक्यातच त्यांनी स्थानिकाच्या कानशिलात लगावल्याचा आरोप झाला होता. तसा व्हिडीओ देखीली व्हायरल झाला होता. दरम्यान या प्रकरणावर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बच्चू कडू व सौरभ इंगोले नावाचा कार्यकर्ता अमरावती येथे दोघेही माध्यमांसमोर आले व त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. मला कुठलीही मारहाण झाली नाही, कानशिलात लगावली नाही केवळ थांब रे म्हटलं. दुसऱ्याला खोटी प्रसिद्ध हवी होती म्हणून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ वाराळ केला, असा दावा व्हिडिओ दिसत असलेल्या कार्यकर्ता सौरभ इंगोले यांनी केला.
बच्चू कडू काय म्हणाले?-
तसेच बातमीच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. सदर व्हिडिओचा विपर्यास केला गेला. मी मारहाण केली नाही आमचं कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक नातं आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
बच्चू कडू आपल्या आक्रमक स्वभामुळे चर्चेत असतात. यापूर्वी देखील बच्चू कडू यांचा प्रहार समोर आला होता. बच्चू कडू यांनी मार्च 2018 मध्ये मुंबईतील राज्य सचिवालय-मंत्रालयात सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केली होची. या प्रकरणी त्यांच्यावर कलम 353, 504 अंतर्गत आणि इतर संबंधित तरतुदींनुसार मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची मोठी घोषणा, ‘या’ ठिकाणी घेणार दसरा मेळावा
- Nana Patole | “ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला
- “खडसे, तावडे आणि पंकजा मुंडेंनंतर फडणवीस महाजनांचा राजकीय काटा काढणार”
- Gopichand Padalkar | “जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले”
- PFI च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची सुरु होती तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

