🕒 1 min read
सांगली : राज्यात दसरा मेळावा वरुन एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या वाद सुरु आहे. तर पंकजा मुंडे देखील परंपरेनुसार दसरा मेळावा घेणार आहे. काही दिवसांपुर्वी धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडें देखील दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली होती. अशातच आता विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनीही दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे.
सांगली जिल्ह्यातील आरेवाडीमध्ये आपण मेळावा घेणार असल्याची घोषणा गोपीचंद पडळकरांनी केली आहे. 2 ऑक्टोबरला आरेवाडीत दसरा मेळावा घेणार असून धनगर समाजाचे आराध्या दैवत असलेल्या आरेवाडीमध्ये मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. धनगर समाजाचे प्रश्न आणि अडचणींवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे, असं देखील ते म्हणाले आहेत.
राज्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाच्या एकनाथ शिंदे गटाला दसरा मेळावा घेता येईल की उद्धव ठाकरे गटाला यावरुन वाद सुरु आहे. त्यामुळे दसरा मेळावाची चर्चा जोरदार रंगत आहेत. अशातच आता गोपीचंद पडळकरांच्या या घोषणेणं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | “ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला
- “खडसे, तावडे आणि पंकजा मुंडेंनंतर फडणवीस महाजनांचा राजकीय काटा काढणार”
- Gopichand Padalkar | “जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले”
- PFI च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची सुरु होती तयारी
- Devendra Fadanvis on PFI : पीएफआय ही संघटना ‘सायलंट किलर’, बंदी योग्यच; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
