Share

घटस्फोट घेतल्यानंतर ही आमिर खान किरण रावसोबत! व्हिडीओ व्हायरल

Published On: 

मुंबई : अभिनेता आमिर खान (Actor Aamir Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. गेल्या वर्षी घटस्फोट (got divorced) घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. मात्र घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण (Kiran Rao) एकमेकांपासून वेगळे होऊ शकलेले नाहीत, नुकतचं दोघ एकत्र असलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

आमिर खानने गेल्या वर्षी पत्नी किरण रावसोबत लग्नाच्या १५ वर्षांनंतर संमतीने घटस्फोट घेत चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. दोघांच्या अचानक घटस्फोटाच्या निर्णयामुळे सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण होत होते. मात्र घटस्फोटानंतरही आमिर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी (ex wife) किरण रावसोबत वेळ घालवताना दिसत आहे. नुकताच आमिर आणि किरणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण येत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओमध्ये तो किरणसोबत बोलताना दिसत आहे. किरणने ब्लॅक टॉप आणि जीन्स परिधान केला आहे तर आमिर खानने हुडी घातला आहे. दोघेही एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. व्हायरल होणारा व्हिडीओ हा फिल्मी ज्ञान या पेजने शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रचंड कमेंट करत नाराजी व्यक्त करत आहेत. तर काहींना ते पुन्हा रिलेशनशीपमध्ये आहेत की काय, असं त्यांच्या वागण्यावरून वाटत आहे.

यापूर्वी आमिर खानही मुलगा आझादच्या वाढदिवसाला किरणसोबत होता. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो याच वर्षी रिलीज होणाऱ्या अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे. किरण रावनेही या चित्रपटात काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!