🕒 1 min read
नाशिक: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी आज नाशिकच्या (Nashik) शासकीय विश्रामगृहात हजेरी लावली. यावेळी राज्याचे अन्न व नागरी परुवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी भुजबळांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागतही केले. (Bhujbal welcomed Governor Koshyari) यादरम्यान त्यांच्यात काहीवेळ चर्चाही झाली. या भेटीमुळे आता अनेक राजकीय चर्चा रंगत आहेत. दरम्यान यावेळी भुजबळांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांसह सर्व प्रकारची वसहतीगृहे खुली करावीत अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
राज्याचे राज्यपाल @BSKoshyari
हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतांना नाशिक गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी,आमदार देवयानी फरांदे,जिल्हाधिकारी सूरज मांढरे,
पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय pic.twitter.com/DejThzI9tO— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 31, 2022
तसेच यावेळी त्यांनी रुग्ण संख्या १८ हजार ५०० वरून १५ हजार ५००वर आलेली असून ३ हजाराने रुग्णसंख्येत घट झाली असल्याचे म्हटले. मात्र मालेगावसह येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात लसीकरण वाढविण्याची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्हॅक्सिन ऑन व्हिल ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे म्हटले. दरम्यान छगन भुजबळ यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागतही केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याच्याच अधिक चर्चा रंगताना आता दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला-खा. नवनित राणा
- ऑलिंपिक पदकविजेता पी.श्रीजेश बनला “वर्ल्ड गेम अँथलीट ऑफ द इयर”
- Budget 2022: या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? वाचा सविस्तर
- भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा आणि कोणी सादर केला? जाणून घ्या..
- गोरगरीब नागरिकांपेक्षा जनावरे महत्वाची आहेत का? जलील यांचा प्रशासनावर गंभीर आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
