🕒 1 min read
औरंगाबाद: जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर लावण्यात आला होता अशा रुग्णांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी तसेच ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी पात्र नागरिकांना लसीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जे नागरिक लस घेणार नाहीत, त्या कुटुंबाला फेब्रुवारी महिन्याचे रेशन न देण्याचा निर्णय तसेच घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनी लस घेतलेली असेल तरच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३ फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी सुरु होईल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सुधाकर शेळके, तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत असल्याने ग्रामीण भागातील पहिलीपासूनच्या शाळा उद्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. कोविड रुग्ण कमी होत असले तरी लसीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ज्या भागातील लसीकरण कमी आहे त्या भागातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे देखील दाखल करण्यात येतील.
घाटी रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही लसीची विचारणा करण्यात येईल. लसीचा किमान एक डोस बंधनकारक आहे. अपघात विभागात येणाऱ्या गंभीर रुग्णांसाठी मात्र लसीची सक्ती करण्यात येणार नाही. तसेच लस घेतलेल्या नातेवाईकांनाच रुग्णांना भेटण्याची परवानगी असेल. ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल’ अंतर्गत ज्या भागात लसीकरण कमी आहे त्या भागात हे वाहन नेण्यात यावे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर लावण्यात आला होता अशा रुग्णांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात यावी. हा गट अशा रुग्णांपैकी किती रुग्णांनी पहिला, दुसरा डोस घेतला होता तसेच किती रुग्णांनी एकही डोस घेतला नाही अशा रुग्णांचा अभ्यास करेल असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- अध्यक्ष गांगुलीचा टीम सिलेक्शनमध्ये हस्तक्षेप का? ; भारतीय क्रिकेटरसिक संतापले
- पंतप्रधान घरकुल योजना म्हणजे ‘सपनो का घर सपने मे ही मिलेगा’; इम्तियाज जलील यांनी साधला मोदींवर निशाणा!
- Budget 2022: देशाला मजबूत आर्थिक धोरण हवेत, जुमलेबाजी नाही; बजेटवर कॉंग्रेसची टीका
- Budget 2022 : कॉर्पोरेट, सहकार क्षेत्राला अर्थमंत्र्यांचा दिलासा; आता भरावा लागणार ‘इतका’ कर
- दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘या’ निर्णयामुळे चाहत्यांना धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
