Share

अखेर निरव मोदीला भारतात आणणार , ब्रिटनच्या गृहमंत्र्यांची प्रत्यार्पणास मान्यता

Published On: 

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. ही माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून फसवणूकीच्या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी यांना अटक करण्यात आली आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरूंगात आहेत. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी मोदी याच्या प्रत्यार्पणाला हिरवा झेंडा दाखविला आहे.

फेब्रुवारीमध्ये कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदीविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे कोर्टाने मान्य केले होते. त्याबरोबरच त्याने केलेल्या अपिलांना रद्दबातल केले होते. कोर्टाने हेही मान्य केले होते की, नीरव मोदी याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसेच काही साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला. कोर्टातून जामीन मिळविण्यासाठी मोदीने उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली मात्र, तो फरार होण्याचा संशय असल्याने त्याचा जामीन रद्द करण्यात आला.

प्रत्यार्पण वॉरंटवरून १९ मार्च २०१९ रोजी नीरव मोदीला अटक करण्यात आली होती. प्रत्यार्पण प्रकरणात अनेक सुनावणी दरम्यान वँड्सवर्थ कारागृहातून व्हिडिओ लिंकद्वारे त्यांचा सहभाग होता. जामीन घेण्याचे त्यांचे अनेक प्रयत्न दंडाधिकारी न्यायालय आणि उच्च न्यायालयात फेटाळले आहेत. कारण, फरार होण्याचा धोका आहे. सीबीआय आणि भारतात अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या खटल्यांनुसार त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी लागेल. याशिवाय त्यांच्यावर इतर काही गुन्हे भारतातही दाखल आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!