🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात घाटीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरुन कोरोनाची दाहकता लक्षात येत आहे. दरम्यान, शनिवारी घाटीकडून आलेल्या अहवालात सायंकाळपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये शहरासह इतर जिल्ह््यातील रुग्णांचा देखील समावेश आहे.
यात जुना जालना, कंचननगरमधील ८१ वर्षीय वृध्देचा १२ मार्च रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास, उस्मानपुरा, पीर बाजारातील ७३ वर्षीय वृध्देचा दुपारी पावणेपाचच्या सुमारास, मयूरपार्कमधील ८५ वर्षीय वृध्दाचा रात्री साडेनऊच्या सुमारास, नूर कॉलनीतील ६० वर्षीय वृध्देचा रात्री पावणेदहाच्या सुमारास, सिडको, एन-९ मधील ६१ वर्षीय वृध्दाचा १३ मार्च रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास, भोईवाडा मिलकॉर्नर येथील ५२ वर्षीय वृध्देचा सकाळी साडेदहाच्या सुमारास,
जालना, कडोली येथील ८५ वर्षीय वृध्देचा सकाळी साडेसातच्या सुमारास, फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथील ६२ वर्षीय वृध्देचा दुपारी दीडच्या सुमारास तर खुलताबाद, टपाल कार्यालयाजवळील ६१ वर्षीय वृध्देचा दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. सध्या घाटीत २१३ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर तर १६१ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर आतापर्यंत घाटीत १ हजार ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


