रत्नागिरी : दि.26 मार्चला दापोली येथे किरीट सोम्मया हे मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अजून पडले गेले नाही या करिता येत आहेत, त्यांच्या या दौऱ्याला म. वि.आ. कडून विरोध होताना पाहायला मिळतोय. यावर मा. आमदार संजय कदम यांनी किरीट सोमय्या यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका मांडली आहे.
यावर आपल्या खास शैलीत निलेश राणे यांनी त्यांना उत्तर दिले आहे. पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांच्या मेव्हण्या बाबतही विधान केले आहे. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा अडकल्यावर लगेच ते ॲक्टिंव्ह झाले सभागृहात आले. त्यांची कंबरपण बरी झाली आणि बाकी दुखणे पण कमी झाले. नाहीतर दोन वर्ष महाराष्ट्र रडत होता तेव्हा मुख्यमंत्री एवढे ॲक्टिंव्ह दिसले नाही.
तसेच रिफायणारी प्रकल्पा बद्दल बोलताना ते म्हणाले सरकार शिवसेनेचे आहे. यांना गांधीजीच लागतात. आणि गांधीजीची काही देवाणघेवाण झाली असेल आणि म्हणून यांना प्रकल्प हवा असेल असे निलेश राणें रत्नागिरीत आले असता त्यांनी हे वक्तव्य केले.
महत्वाच्या बातम्या –
“आमचेच कच्चे दुवे, कच्चे मडके! हे दुर्दैवाने खरे” – राजू शेट्टींची खंत
“…वरून शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
OMG..! अचानक स्क्रीनवरून गायब झाले हर्षा भोगले; VIDEO पाहून तुमचाही जीव पडेल भांड्यात!
दिशा सालियनची हत्याच! लवकरच CBI कडे पेनड्राईव्ह देणार; नितेश राणेंचा इशारा
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर संजय राऊतांची असहमती; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

