Share

OMG..! अचानक स्क्रीनवरून गायब झाले हर्षा भोगले; VIDEO पाहून तुमचाही जीव पडेल भांड्यात!

Published On: 

मुंबई : क्रिकेटविश्वातील प्रसिद्ध समालोचक प्रसिद्ध हर्षा भोगले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयपीएल २०२२च्या १५व्या हंगामासंदर्भात ते इंस्टाग्रामवर लाइव्ह आले होते. यादरम्यान, ते एका प्रश्नाचे उत्तर देत असताना स्क्रीनवरून गायब झाले, त्यांचा फोन खाली पडला. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

हर्षा यांचा फोन खाली पडल्यावर त्यांचा आवाज ऐकू येत होता. तिथे कोण आहे. कुठून आलात?, असे प्रश्न ऐकू आले. हर्षा यांच्या घरात कोणीतरी अचानक शिरल्याचा भास झाला. हे सर्व पाहून मुलाखत घेणारा व्यक्तीही घाबरून गेला आणि त्याला काय झाले ते समजत नाही. त्याने हर्षा यांना सर, ठीक आहात ना? असे विचारले, पण दुसऱ्या बाजूने प्रतिसाद आला नाही.

त्यानंतर हर्षा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून आपण ठीक असल्याचे सांगितसे. ”मी ठीक आहे. माफ करा तुम्ही लोक माझ्यामुळे काळजीत पडलात. माझ्याबद्दल तुमचे प्रेम आणि काळजी दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार. मी इतका व्हायरल झालो आहे, की मी कल्पनाही केली नव्हती. हे देखील शिकण्यासारखे आहे. माझा उद्देश काही दुसराच होता. मला क्षमा. आनंदी रहा”, असे हर्षा म्हणाले.

हर्षा भोगले यांच्या पत्नी अनिता भोगले यांनीही नंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहून पतीच्या प्रकृतीची माहिती दिली. ”मी तुम्हा सर्वांना स्पष्ट करत आहे की हर्षा भोगलेसोबत सर्व काही ठीक आहे. त्याचा एक प्रोमो व्हायरल झाला होता. प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद”, असे अनिता यांनी ट्वीट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!