🕒 1 min read
मुंबई: दिशा सालियन बदनामी प्रकरणी (Disha Salian defamation case) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. ते काल (२४ मार्च) विधानभवनात बोलत होते.
“दिशा सालियनची आत्महत्या नव्हे हत्याच झाली याचा पुरावा आहे.लवकरच कोर्टाच्या माध्यमातून CBI कडे पेनड्राईव्ह देणार”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली तसेच ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेत आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहन केलं होतं. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. या प्रकरणावर कोर्टाने राणे पिता-पुत्रांना दिलासा दिला असला तरी, याबाबत नितेश राणे यांनी हा दावा करत पुन्हा एकदा नव्या चर्चांना वाट करून दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होऊन दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याबाबत चौकशी केली जात होती. त्यात दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यातच नारायण राणे यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती.
नारायण राणेंचे ‘ते’ ट्वीट-
खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?
महत्वाच्या बातम्या:
“यापुढे आघाडीत सहभागी व्हायचं की नाही, हा निर्णय…” – राजू शेट्टी
…त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या- राजू पाटील
VIDEO : “चांगलं वाटतंय, पण…”; CSKचा कॅप्टन झाल्यानंतर जडेजा पहिल्यांदा काय म्हणाला पाहा!
फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ आरोपावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले ,”यांना दाऊदने सुपारी दिली…”
नागराज मंजुळे झाले आता डॉक्टर! डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज यांचा मोठा सन्मान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
