मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. राज्य सरकार आणि दहीहंडी समन्वय समितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले असतानाच आता मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाबाबत नियमावली जाहीर केली आहे.
गेल्यावर्षी प्रमाणेच यंदा देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा यासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. यामध्ये गतवर्षीच्या नियमवाली कायम राहील असं ठरलं आहे. तर गणेशभक्तांना दर्शनासाठी परवानगी देण्यात यावी का याबाबतचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येईल.
कशी आहे नियमावली ?
- सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट.
- घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी
- गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळानी घ्यावी.
- 84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाण.
- विसर्जन ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती द्यावी लागेल. नंतर महापालिकेमार्फत गणेश विसर्जन होणार.
- सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी केवळ 10 कार्यकर्त्यांना परवानगी मिळणार.
- लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाला जाऊ नये.
- मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने आणि आता जन आशीर्वाद यात्रा काढून आणखी आमंत्रण दिलं जातंय
- ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- पुणे जिंकणार, कोरोना हरणार! आज नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
- ‘पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्वाचा असला तरी मानवाचा जीवसुध्दा महत्वाचाच’


