Share

Naresh Mhaske : “आम्ही संयम राखलेला आहे, आमच्या संयमाचा कुठेतरी…”; नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

Published On: 

Naresh Mhaske । मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात आता एकमेकांवर टीका होण्यास सुरवात झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून आदित्य ठाकरे अॅक्शन मोडवर दिसत आहेत. सध्या राज्यभर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मनमाड येथील मेळाव्यात बोलताना बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. तर यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.

नरेश म्हस्के म्हणाले कि, आदित्य ठाकरे यांचं जेवढं त्यांचं वय आहे तेवढी वर्ष आम्ही शिवसेनेसाठी मेहनत केलेली आहे. पाठीत खंजीर खुपसला अशा पद्धतीने आम्हाला बोललं नाही पाहिजे. माझे आदित्य साहेबांना विनंती आहे जर अशा पद्धतीने आमच्याबद्दल ठाण्यात येऊन आरोप करायला लागले तर आम्हाला सुद्धा बोलावं लागेल. वरुण देसाई किंवा सुरज चव्हाण अशा कल्चर युवा सैनिकांनी शिवसेना वाढवलेली नाही… ते तेंडर मिळण्यासाठी सोबत आले, त्यांना तुम्ही टेंडर दिले. आम्हाला काय दिलं. आम्ही संयम राखलेला आहे आमच्या संयमाचा कुठेतरी बांध फुटेन. त्यामुळे अशी वक्तव्य करू नयेत, असं म्हणत आदित्य ठाकरेंवर टीका केली.

दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. आता संपूर्ण राज्यात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती. असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!