सिंधुदुर्ग : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत.केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलक शेतकरी गाजियाबाद-दिल्ली सीमेवर पोहोचले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘ ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास रोखले गेले आहे, असे वाटते कि ते या देशाचे नाहीत. त्यांना दहशतवाद्यांसारखे वागवले गेले आहे. ते शीख असल्यामुळे आणि पंजाब आणि हरियाणाहून आले आहेत, त्यांना खलिस्तानी म्हणतात. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.’ अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.
संजय राऊत यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी अतिशय बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘ संज्या राऊतला पंजाबच्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचा अधिकार काय??? महाराष्ट्रात शेतकरी तडफडतोय, जीव देतोय त्याचं ठाकरे सरकारला काही नाही. संज्या राऊत चं थोबाड कधीतरी आपल्या राज्यातला शेतकरी रंगवेल तेव्हा लक्षात येईल ह्या हलकटांना की शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करायचं नसतं.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
संज्या राऊतला पंजाबच्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचा अधिकार काय??? महाराष्ट्रात शेतकरी तडफडतोय, आत्महत्या करतोय त्याचं ठाकरे सरकारला काही नाही. संज्या राऊत चं थोबाड कधीतरी आपल्या राज्यातला शेतकरी रंगवेल तेव्हा लक्षात येईल ह्या हलकटांना की शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करायचं नसतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 29, 2020
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !
- सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला : चंद्रकांत पाटील
- ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे
- विद्या बालनने वनमंत्र्यांचे डिनरचे निमंत्रण नाकारल्याने तिच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्याच्या चर्चा !
- कॉंग्रेसचा हात सोडणाऱ्या उर्मिला मातोंडकर उद्या बांधणार मनगटावर शिवबंधन ?


