🕒 1 min read
मुंबई: मशिदींमध्ये भोंगे वापरणे हा मूलभूत अधिकार नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. उत्तर प्रदेशमधील बदाऊन जिल्ह्यातील इरफान यांनी केलेली याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने हे मत मांडले. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
“मशिदीवरील भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका अर्थी हा देश फक्त आणि फक्त संविधानानुसारच चालेल हे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले. या देशात काही जणांना फक्त अधिकार कळतात, कर्तव्ये नाहीत.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
मशिदीवरील भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
एका अर्थी हा देश फक्त आणि फक्त संविधानानुसारच चालेल हे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.
या देशात काही जणांना फक्त अधिकार कळतात, कर्तव्ये नाहीत.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 6, 2022
दरम्यान मे २०२० मध्ये उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकांवर निर्णय देताना नमूद केले होते, की अजान हा इस्लाम धर्मातील अविभाज्य भाग आहे. परंतु प्रार्थना म्हणताना भोंग्याचा वापर करणे ही धार्मिक अनिवार्य बाब होऊ शकत नाही. दरम्यान योगी सरकारने यूपीतील ५० हजार भोंगे हटवले असून ६० हजार ठिकाणांवरील आवाजावर मर्यादा आणली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो”- सुधीर मुनगंटीवार
- “भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना जनतेचा ठेंगा मिळाला” – गुलाबराव पाटील
- “फुले, शाहुंचे विचार आंबेडकरांनी पुस्तकात बंद केले”- जितेंद्र आव्हाड
- राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचे प्रत्युत्तर!
- राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
