Share

“…मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी असं काय पाप केलं?”, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: “निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट गुणवत्तेच्या आधारावर दिले जाईल. तुम्ही कितीही ताकदवान असाल, कितीही मोठे  असाल तरी तुम्ही गरीब, शेतकऱ्यांसोबत नसाल तर तुम्हाला काँग्रेसचे तिकीट मिळणार नाही”, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी तेलंगणातील वारंगलमध्ये केले. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी कॉंग्रेसला खोचक सवाल केला आहे.

“राहुल गांधींनी तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं मोठं आश्वासन दिलं आहे. मग ज्या राज्यात तुम्ही सत्तेत सामील आहात त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी असं काय पाप केलं आहे की, त्यांना तुम्ही कर्ज माफी देत नाही? थापा मारायच्या परदेशात जायचं, परदेशातून यायचं परत थापा मारायच्या.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली तर,  शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करून योग्य आधारभूत किंमत देणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच तेलंगणात अशा हजारो भगिनी आहेत, ज्यांच्या पतीने आत्महत्या केलीय. ही जबाबदारी कुणाची? असा सवाल करत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!