🕒 1 min read
पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात सोमवारी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.
शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे आक्रमक भूमिका घेत शरजिल उस्मानी याच्यावर सडकून टीका केली आहे. ‘एक हरामी शरजील उस्मानी हिंदू समाजावर टीका करतो पण त्याच्यावर फक्त FIR केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे, परत कुठल्या हरामीची हिम्मत होणार नाही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायची’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
एक हरामी शरजील उस्मानी हिंदू समाजावर टीका करतो पण त्याच्यावर फक्त FIR केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे, परत कुठल्या हरामीची हिम्मत होणार नाही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायची.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 3, 2021
महत्वाच्या बातम्या
- विदर्भातील ‘हे’ माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर?; जयंत पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण
- पोलिसांच्या नाकाबंदीमुळे शौचालय, टँकर्सपर्यंत पोहोचता येईना; आंदोलकांची हेळसांड
- मुंबईत पक्षाच्या वाढीसाठी काय करता येईल याविषयी जेष्ठ नेत्यांचे फडणविसांनी जाणून घेतले मत
- पॉपस्टार रिहाना नंतर ग्रेटा थनबर्गचा देखील शेतकरी आंदोलनाला पाठींबा !
- देशाला भकास करणारा व विश्वासघात करणारा अर्थसंकल्प – हुसेन दलवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
