🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे.
We stand in solidarity with the #FarmersProtest in India.
https://t.co/tqvR0oHgo0— Greta Thunberg (@GretaThunberg) February 2, 2021
रिहानानंही शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. आपण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत का नाहीत?, असा सवाल तिने ट्विटद्वारे केला आहे. याचबरोबर भारतीय पर्यावरणासाठी काम करणारी कार्यकर्ता लिसिप्रिया कंगुजम हिनेही काही दिवसांपूर्वी ट्विट करून जाहीरपणे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास नकार दिल्याने कंगुजम चर्चेत आली होती.
महत्वाच्या बातम्या
- ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एक वसतिगृह उभारणार : मुंडे
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !’
- ‘भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा त्यापेक्षा जास्त गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱ्यांना प्यारा’
-
जो महाराष्ट्र वर्षभरात १ लाख ९० हजार कोटी जीएसटी देतो त्या महाराष्ट्राला काय मिळाले?
-
फडणवीस सरकारने नव्हे, एका भाजप मंत्र्याने मला त्रास दिला होता- डॉ.तात्याराव लहाने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
