🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
सद्या, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. आता, बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दरम्यान, बिहार निवडणुकांनंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बंगालच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं देखील बोललं जात होतं.
मात्र आता, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बंगालच्या निवडणुकांबाबतची पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांना शिवसेनेचा पाठींबा असल्याचं सांगत शिवसेना निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट करून भाष्य केलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 4, 2021
त्यानंतर आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेच्या या माघारीवरून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ‘जो पक्ष महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो शिवसेना पक्ष बंगाल मध्ये निवडणुक लढणार नाही कारण ममता दीदी तिकडच्या वाघीण आहेत.. काय कारण सोधलय. शिवसेना कधीच खरं बोलणार नाही की इतर राज्यात १ आमदार काय १ नगरसेवक पण कधी निवडून आला नाही पण ते सांगणार कसं’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
जो पक्ष महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो शिवसेना पक्ष बंगाल मध्ये निवडणुक लढणार नाही कारण ममता दीदी तिकडच्या वाघीण आहेत.. काय कारण सोधलय. शिवसेना कधीच खरं बोलणार नाही की इतर राज्यात १ आमदार काय १ नगरसेवक पण कधी निवडून आला नाही पण ते सांगणार कसं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- कोरोनाचा धोका वाढला : औरंगाबादेत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तिनशेपार
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
