जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थ ४४ दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करीत आहेत. विधानसभेतही साष्टपिंपळगाववासीयांच्या आंदोलनाची चर्चा झाली आहे. परंतु जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्राच साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, आता ७ मार्च रोजी आक्रोश मेळावा होणार असून या अनुषंगाने प्रत्येक गावांत शिव संवाद मेळावा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी मेळावे घेऊन या दिवशी साष्टपिंपळगाव येथे येण्यासाठीचे नियोजन करीत आहेत. या मेळाव्यांमधून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मोठा लढा उभारण्यात येणार आहे.
राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार : अशोक चव्हाण
मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल. परंतु या प्रकरणात काही संवैधानिक व कायदेशीर पेच असून, त्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची गरज असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत सदस्य शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते. या प्रकरणाबाबत येत्या ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन
- अक्षरची कमाल कामगिरी ! पहिल्याच दिवशी ४ विकेट्स घेत केला ‘हा’ मोठा विक्रम
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
