औरंगाबाद: वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते. मात्र, यंदा ही यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दर्शनही घेता येणार नाही. प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. काही स्थानिक भाविक मोजक्या संख्येत जातील आणि महाशिवरात्रीची पूजा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी घृष्णेश्वर मंदिरात पालखी सोहळा आयोजित केला जातो. यंदा हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दिवशी मुख्य पूजाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच करा, अशी सूचना प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिल्या आहेत.
पुढील आठवढ्यात ११ मार्च रोजी महाशिवरात्र आहे. यानिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठी यात्राही भरते. मात्र, कोरोनामुळे ही गर्दी धोक्याची ठरू शकते त्यामुळे यंदा ही यात्रा तर रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा वेरूळ येथील यात्रा तसेच दर्शन भाविकांसाठी रद्द करण्यात यावे या मागणीसाठी घृष्णेश्वर ट्रस्टच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
