Share

गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या

Published On: 

जालना : देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिंलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. याचाच निषेध करत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता इंधन दरवाढही होत असल्यामुळे सर्वसामान्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांना गोवऱ्या पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

गॅस दरांमध्ये दिवसागणिक होत असलेल्या वाढीचा निषेध म्हणून जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांच्या सूचनेनुसार घनसावंगी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पोस्टाने पाठवण्यात आल्या. या वेळी तालुकाध्यक्षा वंदना पवार, कमल चिमणे, कौशल्या चिमणे, सरस्वती डोरले, रुक्मिणी चिमणे, अयोध्या चिमणे, रुक्मिणी नारायण चिमणे आदी महिलांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!